Aamir Khan च्या मुलीचे नाव इरा नसून 'हे' आहे खरे नाव, चुकीचे नाव उच्चारल्यास 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याची व्हिडिओद्वारे दिली माहिती
Ira Khan (Photo Credits: Instagram)

आमिर खानच्या (Aamir Khan) मुलगी इराच्या (Ira) नावाबाबत एक मोठी बातमी तिने स्वत: नेच तिच्या सोशल अकाउंटवर व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. आपल्या नावाबद्दल सर्वांना गैरसमज झाला असून तिच्या मैत्रिणींपासून मिडियादेखील चुकीचे पद्धतीने उच्चारते असे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या त्रासाला आपण कंटाळले असून यापुढे आपले नाव चुकीचे उच्चारणा-यास ती 5000 रुपयांचा दंड आकारणार आहे असेही तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यामुळे न केवळ तिच्या मैत्रिणींना तर मिडियाला देखील हा भुर्दंड भरावा लागू शकतो.

"माझं नाव ईरा नाही तर eye-ra म्हणजेच आयरा आहे" असे तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आयराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. "मिडियामध्ये आणि इतर अनेकजण माझं नाव इरा म्हणत असल्याने माझ्या मैत्रिणींनी मला प्रचंड त्रास दिला आहे. पण माझं नाव इरा नसून ते आयरा आहे" असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.हेदेखील वाचा- आमिर खान ची मुलगी इरा खान हिचा 'Saturday Vibe' मधील Hot अंदाज पाहून तुम्हीही व्हाल हैराण (See Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

"जो कुणी माझं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला 5 हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन.”असंही ती पुढे म्हणाली. "ira. eye-ra.Nothing Else" असे कॅप्शन आयराने या व्हिडिओला दिले आहे.

आयरा सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या अनेक बॉलिवूड स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आयराही बॉलिवूडमध्ये येणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये आयरा ने आपण मागील 4 वर्ष क्लिनिकल डिप्रेशनमध्ये (Clinical Depression) असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती.