A R Rahman यांच्या मुलीने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर फोटो शेअर करुन आनंद केला व्यक्त
Photo Credit - Instagram

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांची मुलगी खतिजा रहमान (Khatija Rahman) लग्ण बंधणात (Wedding) अडकली आहे. खुद्द एआर रहमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना त्याने सांगितले की, त्याच्या मुलीचे लग्न तिच्या मंगेतर रियासदीन रियानसोबत (Riyasdeen Shaik Mohamed) झाले आहे. फोटोमध्ये, नववधू खतिजा आणि तिचा नवरा सोफ्यावर एकत्र बसलेले दिसत आहेत. त्याचवेळी एआर रहमान आपल्या मुलीच्या मागे उभा आहे. रहमान यांचा जावई व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत रहमानने लिहिले, 'देव या नवीन जोडप्याला आशीर्वाद देवो, सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.' ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यावर दोन लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर लोक कमेंट करून नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

सेलिब्रिटीकडून शुभेच्छाचा वर्षाव

या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील कमेंट्स आणि लाईक्सद्वारे विवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने प्रतिक्रिया दिली, 'खतिजा आणि रियासदीन रियानचे हार्दिक अभिनंदन. देव या सुंदर जोडप्याला आशीर्वाद देवो.' यासोबतच लोक या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत. (हे देखील वाचा: Dhanush Paternity Case: अभिनेता धनुष आपला मुलगा असल्याचा जोडप्याचा दावा; मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेत्याला बजावले समन्स)

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

खतिजा रहमानने 29 डिसेंबरला रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा केला होता. त्या दिवशी तिचा वाढदिवसही होता.त्यानंतर खतिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. खतिजाने लिहिलं होतं की, 'सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने, रियासदीन शेख मोहम्मदसोबत माझा साखरपुडा झाला हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. तो एक उद्योजक आणि ऑडिओ इंजिनिअर आहे. माझ्या वाढदिवशी 29 डिसेंबरला जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. फारच कमी लोकांना माहिती असेल की, एआर रहमान यांची मुलगी खतिजाने तामिळ चित्रपटांसाठी काही गाणी गायली आहेत.