Mahesh Babu सोबत Alia Bhatt मोठ्या पडद्यावर! SS Rajamouli यांच्या चित्रपटात दिसणार एकत्र
Mahesh Babu, SS Rajamouli And Alia Bhatt (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' (Brahmastra) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित (Ayan Mukerji) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि या चित्रपटाने 300 कोटी क्लबमध्येही प्रवेश केला आहे. त्याचवेळी, आता बातमी समोर आली आहे की 'RRR' नंतर आलिया भट्ट पुन्हा एकदा एसएस राजामौलीसोबत (SS Rajamouli) मोठ्या पडद्यावर पुन्हा धूमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने एसएस राजामौली यांचा चित्रपट साइन केला आहे, ज्यामध्ये ती महेश बाबूसोबत (Mahesh Babu) दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेटही 800 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार होणार आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर चित्रपटाचे शूटिंग केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आलिया भट्ट लवकरच या जगात तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की एसएस राजामौली महेश बाबूसोबत पॅन इंडिया चित्रपट बनवणार आहेत. राजामौली यांनी अमेरिकेतील एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सांगितले होते की, त्यांचा पुढचा चित्रपट जगभरातील अॅक्शन अॅडव्हेंचर असेल. राजामौली आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांप्रमाणेच पुढील धमाका करण्यास सज्ज आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. (हे देखील वाचा: Thank God Controversy: अजय देवगणचा 'थँक गॉड' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, तक्रार दाखल)

आलिया भट्ट सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर आलिया रणवीर सिंहसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. 'जी ले जरा'मध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.