जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि बोनी कपूर ची कोरोना रिपोर्ट आले समोर, घरातील अन्य 3 लोकांना COVID-19 ची लागण
Boney Kapoor & his Family (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) अवघ्या देशात धुमाकूळ घातला असून हा विषाणू आता बॉलिवूड कलाकारांच्या घरातही पोहोचला आहे. बॉलिवूड मधील प्रसिद्ध कुटूंब बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या घरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बोनी कपूरसह मुली जान्हवी (Jhanvi Kapoor) आणि खुशी (Khushi Kapoor) ची ही कोरोना चाचणी करण्यात आली. बोनी कपूरच्या घरी काम करणा-या नोकराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या घरातील सर्व कर्मचारी आणि सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात घरातील अन्य दोघांना अशा एकूण 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींचेही रिपोर्ट्स समोर आले.

एबीपीच्या रिपोर्टनुसार, बोनी कपूर यांच्या घरातील 3 नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र बोनी कपूर आणि त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशी यांना कोरोनाची लागण झाली नसून त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. Sridevi 2nd Death Anniversary: दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनी जान्हवी कपूर झाली भावुक; 'तुझी दररोज आठवण येते' म्हणत शेअर केला आईसोबतचा जुना फोटो

रिपोर्ट्सनुसार असे सांगण्यात येत आहे की, जेव्हा बोनी कपूरच्या घरातील एकाला कोरोनाची लागण झाली तेव्हा घरातील सर्वांची कोरोना चाचणी कऱण्यात आली.

Bhubaneswar Sky: Amphan वादळानंतर गुलाबी रंगाच झाले ओडिसा चे आकाश; पाहा आकाशाचे मनमोहक फोटो - Watch Video 

बोनी कपूर आणि त्यांचे कुटूंब मुंबईतील लोखंडवाला येथील ग्रीन एकड़ कॉम्प्लेक्स मध्ये राहतात. त्यांच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बोनी कपूर यांनी सांगितले आहे की, 'ते आणि त्यांचे कुटूंब सुरक्षा आणि स्वास्थ्य वर पूर्ण लक्ष देत आहे.'