Coronavirus: कोरोना विरोधातील लढाईसाठी बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मदतीचा हात पुढे केला आहे. शिल्पाने पीएम केअर फंडसाठी (Pm Cares Fund) 21 लाखांची मदत केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, देशातील अनेक नेते, उद्योजक, बॉलिवूड कलाकार आदींनी कोरोना विरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात लोकांना योगाचे धडे देणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागे राहिलेली नाही. तिने पीएम केअर फंडसाठी 21 लाख रुपयांची मदत केली आहे.
शिल्पाने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. शिल्पाने शेट्टीने या ट्विटमध्ये सांगितले की, 'मी माझ्या इच्छेनुसार पीएम केअर फंडला मदत केली आहे. आज एक छोटीशी मदत देखील खूप गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी. सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना करू या', असंही शिल्पाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In Maharashtra: पुणे शहरात खाजगी रूग्णालयामध्ये 52 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा 9)
For humanity, our country, & fellow citizens that need us; now is the time, let’s do our bit.@TheRajKundra & I pledge 21 lacs to @narendramodi ji‘s PM-CARES Fund. Every drop in the ocean counts, so I urge you all to help fight this situation.#IndiaFightsCorona @PMOIndia https://t.co/A0p2sAbGs8
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) March 29, 2020
देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर देशातील अनेक दिग्गजांनी तसेच सर्वासामान्यांनी सढळ हाताने मदत दिली आहे.