Akshay Kumar with his 2.0 Costar Rajinikanth . (Photo Credit: Twitter)

‘2.0’ Box Office Collection : Thalaivaa अशी ओळख असणारा दक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार रजनीकांत ( Rajinikanth) यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक नवा विक्रम रचला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार (Akshay Kumar)  आणि रजनीकांत (Rajinikanth)  यांचा प्रदर्शित झालेला ‘2.0’या सिनेमाने बॉक्सऑफिसवरील कमाईत हा विक्रम रचला आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये या सिनेमाने 19.3 कोटींची कमाई केली आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ‘2.0’या सिनेमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. चैन्नईतील बाहुबली 2 सिनेमाच्या कमाईचा विक्रम मोडीत काढत आता ‘2.0’सिनेमाने नवीन विक्रम रचला आहे. सिनेमाच्या रिलीज नंतर सातव्या दिवशी जगभरात 500 कोटी कमाईचा आकडा पार करत ' बाहुबली' (Baahubali) सिनेमावर मात केली होती. आज वाढदिवसादिवशी रजनीकांत  यांनी बाहुबली 2 चादेखील विक्रम मोडीत काढल्याने सोशल मीडियावर  12-12-12 या जुळून आलेल्या नव्या योगायोगाची चर्चा आहे.   2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन !

भारताप्रमाणेच जगभरामध्ये ‘2.0’ या सिनेमाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर (S. Shankar) यांनी केले आहे. 2.0 हा भारतातील सर्वात महागडा सिनेमा असून यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.