the buckingham murders Photo Credit X

The Buckingham Murders' Trailer: अभिनेत्री करिना कपूर यांचा थ्रिलर मर्डर मेस्ट्री चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. द बकिंंघर्म मर्डर्स चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांना सिमेनाबद्दल उत्सुकता लागली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कमालीची ओढ लागली आहे. चित्रपटात भरपूर सस्पेन्स आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे.  (हेही वाचा- स्त्री २ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, 500 कोटींचा टप्पा केला पार)

करीना कपूरने चित्रपटाचे ट्रेलर इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या चित्रपटाचा टीझर पाहूनंच प्रेक्षकांनी भरपूर रिस्पोन्स दिला होता. चित्रपटात करीना कपूर एका पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे, १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हत्येसाठी तीन मुस्लिस समाजातील काही मुलांना ताब्यात घेतले आहे. यानंतर ती लोकांची कसून चौकशी घेत आहे. यात तिचा वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये पाच संशयित असूनही खरा आरोपी कोण याचा तपास करताना ती दिसत आहे.

'द बकिंघम मर्डर्स' चित्रपटाचा ट्रेलर

 

चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करिना कपूर  खान सोबत ॲश टंडन, रणवीर ब्रार आणि कीथ ॲलन कलाकार आहेत. हा चित्रपट हंसल मेहता दिग्दर्शित असून असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिलेला आहे. सस्पेन्सने भरलेल्या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर आणि करीना कपूर खान यांनी केली आहे.