हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असतानाचं आता बोल्ड मॉडेल पूनम पांडेला (Bold Model Poonam Pandey) बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याची धमकी (Threatens to Rape and Acid Attack) देण्यात आली आहे. त्यामुळे पूनम पांडेने मुंबई पोलिसांना ट्विट करून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात तिने आपल्या ट्विटर हँडसवरून माहिती दिली आहे. यात तिने गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि मुंबई पोलिसांना मेन्शन केल आहे. तसेच माझा मोबाईल नंबर तोतियागिरी अॅपवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे याची लवकरात लवकर दखल घ्यावी, असे पूनम पांडेने म्हटलं आहे. (हेही वाचा - पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया)
यासंदर्भात पूनम पांडेने सांगितले की, माझा मोबाईल नंबर सार्वजनिक करण्यात आला आहे. मी यासंदर्भात अनेकदा गुगलकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मला वारंवार बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे मला भीती वाटत आहे. आपण मला मदत करा, असंही पूनमने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
We have followed you. Can you please share your contact details on DM.
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 7, 2019
पूनम पांडेने आज सकाळी हे ट्विट केलं असून मुबंई पोलिसांनी तिच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे. आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेत आहोत. कृपया तुम्ही तुमचा नंबर आम्हाला शेअर करा, असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी पूनम पांडेला केला आहे.