Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  च्या घरात स्पर्धकांचा प्रवास जसा पुढे सरकत आहे तशी या घरात कुटनीती वाढत आहे. दरम्यान या आठवड्यात 'टिकेल तो टिकेल' या टास्क दरम्यान घरात पराग आणि नेहामध्ये वाद झाल्याने थांबवण्यात आलेला खेळ आता आज पुढे सरकरणार आहे. या खेळामध्ये परागला उठायला भाग पडण्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धी टीमकडून बळाचा वापर करण्यात आला असा दावा परागने केला आहे. या रागातच खूर्चीवरून पडल्यानंतर परागने नेहा शितोळेच्या कानशिलात लगावण्याचं सांगितलं जात आहे. आज परागच्या या कृत्याचा निषेध म्हणून त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.  आजपर्यंत नेमकं काय झालं? 

 परागला माफी मागावी लागणार? 

परागला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय आज बिग बॉस नेहाच्या हातात देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवानीप्रमाणे त्याच्याही घरातून हाकालपट्टी होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

घरात शिव आणि वीणा त्यांच्या ग्रुपसोबत लॉयल खेळत नसल्याचा वाद आजही पुन्हा समोर येणार आहे. वीणा आणि रूपालीमध्ये या त्यांच्या वागण्यावरुन पुन्हा वाद होणार आहे.

वीणा आणि हीनामध्ये झालेल्या गैरसमजुतीमुळे वीणा नाराज होते. चूक लक्षात आल्यानंतर हीना वीणाची माफीदेखील मागते. मात्र या प्रकारामुळे नाराज हीनाला अश्रू अनावर होतात.