आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे खास मराठमोळं ट्वीट
अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

आज (12 जुलै) दिवशी महाराष्ट्रासह देशा-परदेशात विठू माऊलीचे भक्त आषाढी एकादशीचा सण साजरा करत आहेत. वारकरी 21 दिवसांची वारी चालत पंढरपूरात पोहचले आहेत तर इतर सामान्य विठ्ठल भक्त जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा घरच्या घरी विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करत आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी देखील आज ट्विटरच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi)  शुभेच्छा दिल्या आहे. या शुभेच्छा देताना त्यांनी मराठमोळ्या भजनाच्या काही ओळी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Images, WhatsApp Status, Messages आणि शुभेच्छापत्रं!

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट

आज विठू माऊलीचा आषाढी एकादशीचा सण साजरा करताना त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहो अशी प्रार्थना केली आहे. अमिताभ बच्चन हे गणेशभक्त देखील आहे. नियमित अमिताभ बच्चन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीदेखील हजर राहतात. महाराष्ट्रात आषाढीचा सण साजरा करताना भक्तजण एकादशीचा उपवास करतात.