Amrita Pandey Suicide Case: भोजपूरी अभिनेत्रीची राहत्या घरात आत्महत्या, पोलिस तपास सुरु
Amrita Pandey DIes PC INSTA

Amrita Pandey Suicide Case: भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील( Bhojpuri Film Industry) प्रसिध्द अभिनेत्री अमृता पांडेचा (Amrita Pandey) राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ती बिहार येथील भागलपूर जोगसर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अपार्टमेंटमध्ये वास्तवास होती. धक्कादायक म्हणजे अमृताने आत्महत्याच्या काही तासांपूर्वी  व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवला होता. अनेक कलाकारांनी तिच्या निधनानंतर श्रध्दांजली वाहली आहे. (हेही वाचा- प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

मिळालेल्या माहितीनुसार, अमृताने राहत्या घरात साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला. ती मृतावस्थेत बेडवर सापडली. पोलिसांना माहिती मिळताच, तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीच्या काही वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. २७ एप्रिल रोजी अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला.  या घटनेनंतर भोजपूरी चित्रपट क्षेत्रात शोक पसरला आहे.

अमृताने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. तीच्या जाण्यानंतर कुटुंबियांना धक्काच बसला आहे. अमृताने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक स्टेटश ठेवला होता. त्यात असं लिहलं होत की, त्यांचे आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे. मी माझी बोट बुडवून त्याचा मार्ग सुकर केला. या स्टेटसवर अनेक बाजू समोर येत आहे. तीच्या कुटुंबियांनी सांगितले की, तीला करियर संदर्भात मोठी चिंता होती. तीला चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. २०२२ मध्ये तीने लग्न केलं होते.