Kanakalatha Passed Away: प्रसिध्द अभिनेत्री कनकलथा काळाच्या पडद्याआड, मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा
Kanakalatha PC TWITTER

Kanakalatha Passed Away: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री कनकलथा यांचे सोमवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 63व्या वर्षी अभिनेत्रीने तिरुवनंतरपुरम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. पार्किन्सन्सच्या आजारामुळे त्यांच निधन झाले. कनकलथा यांनी विविध भाषांमधील 360 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. दोन वर्षांपासून त्या गंभीर आजारी होत्या. त्यांनी अनेक मालिका, नाटक, शोजमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. (हेही वाचा- 'Titanic' चे अभिनेता बर्नार्ड हिल यांचे 79 व्या वर्षी निधन)

अधिका माहितीनुसार, कनकलथा यांचा पहिला चित्रपट अनर्थुपट्टू होता. जो 1980 मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी अनेत तमिळ चित्रपटांत काम केले. प्रियाम, वर्णापाकिट्टू, स्पाडिकम, किरीदम आणि चिल्लू असे अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. नाटकात काम करून अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. 1980 आणि 90 च्या दशकात त्यांच्या सहाय्यक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर  छाप उमटवली.

कनकलथा यांनी वयाच्या 22 व्या वर्षी लग्न केलं आणि लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्यांच्या जीवनात अनेक अडचणींना मात केले. 2022 मध्ये निद्रानाश आणि स्मृतिभ्रंश झाल्याने त्या गंभीर आजारी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची बहिणींनी त्यांचा संभाळ केला. त्यांच्या निधनाची माहिती कळताच, मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि लाखो चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहली.