कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतात आपले पाय रोवले आहेत. 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास (Prabhas) नुकताच जॉर्जियाहून शुटींग संपवून भारतात परतला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रभासने स्वत:ला आयसोलेट (Isolate) केलं आहे. विशेष म्हणजे प्रभासने यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
परदेशातून आलेल्या काही व्यक्ती स्वत:ची माहिती लपवून ठेवत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बॉलिवुड गायिका कनिका कपूर हिने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती लपवली होती. त्यानंतर तिने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यानंतर कनिकावर धोकादायक आजार पसरवल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांचा ‘जनता कर्फ्यू’ संदर्भातील व्हिडिओ ट्विटरने केला डिलिट)
On safely returning from my #Prabhas20 shoot abroad, in light of the increasing risks of #Covid19, I have decided to self quarantine.Hope you all are also taking the necessary precautions to be safe. - #Prabhas via Instagram.#JanataCurfewChallenge #StayHomeStaySafe pic.twitter.com/sv1ee6Szmm
— Prabhas (@PrabhasRaju) March 21, 2020
दरम्यान, प्रभासने मात्र स्वत:ला आयसोलेट केलं आहे. त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. प्रभासने आपल्या ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, 'परदेशात शुटींग करुन आल्यानंतर कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन मी स्वत: ला अलग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मला आशा आहे की, तुम्हीही सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहात,' अशी आशा प्रभासने व्यक्त केली आहे.