Atul Parchure (Photo Credits: File Photo)

अभिनेता अतुल परचुरे(Atul Parchure) यांना ऑनलाईन माध्यमातून एक बॅग विकत घेताना सुमारे 17,641 रूपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दादर पोलिस स्टेशनमध्ये (Dadar Police Station) याप्रकरणी अतुल परचुरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

बॅग विकत घेताना जर ऑनलाईन माध्यमातून पैसे दिले तर 2000 रूपयांचे डिस्काऊंट दिले जाईल अशी ऑफर होती. मात्र या ऑफरला भुलून अतुल परचुरे यांना सुमारे17,641 चा फटका बसला आहे. महिन्याभरानंतरही अतुल परचुरेंना बॅगेची डिलेव्हरी मिळाली नाही.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च दिवशी सोशल मीडियात सर्फिंग करताना अतुल परचुरेंना एका शोल्डर बॅगेवर खास ऑफर दिसली. या बॅगेची मूळ किंमत 42,615 रूपये इतकी होती. मात्र सेलमध्ये त्याची किंमत 19,176 इतकी करण्यात आली होती. 12 मार्च दिवशी एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यानंतर त्यांना आकर्षक ऑफरबाबत सांगण्यात आले त्यानुसारअधिक 8% म्हणजे 2000 रूपयांची सवलत ऑनलाईन पेमेंटवर देण्यात आली होती. अतुल परचुरे यांनी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला.

ऑर्डरचा पाठपुरवठा केल्यानंतर 30 मार्च पर्यंत ऑर्डर मिळेल असे सांगण्यात आले मात्र महिना उलटला तरीही ऑर्डर न मिळाल्याने अखेर 12 एप्रिल दिवशी अतुल परचुरेंनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

अतुल परचुरेंनी HT ला दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन पेमेंट पोर्टल ऑथेंटिक असून त्यांना फसवण्यात आलेले नाही. मात्र पोलिस संबंधित फसवणूक करणार्‍यांचा तपास घेतील आणि दोषींवर कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.