Asha Bhosle Grand Daughter : आशा भोसलेंची नात बॉलिवूड सुंदरींना टाकतेय मागे; लवकरच करणारे चित्रपटसृष्टीत पर्दापण
Photo Credit - Twitter

Asha Bhosle Grand Daughter Zanai Bhosle : दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) लवकरच सिने सृष्टीत पदार्पण करणार आहे. 'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' (The Pride of Bharat Chhatrapati Shivaji Maharaj) या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. संदीप सिंह सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. जनाई ही शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसले यांच्या भूमिका साकारणार आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात असल्यामुळे तिच्याकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. 'द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज' हा सिनेमा 19 फेब्रुवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.