Anant-Radhika pre-wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने 'एवढ' घेतलं मानधन; आकडा पाहून व्हाल थक्क
Photo Credit -Twitter

Anant-Radhika pre-wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेट, मेटाचा सीईओ मार्क झुकेरबर्ग, डोनान्ल्ड ट्रम्प यांची पत्नी इवांका यासह अनेक हॉलिवूड, बॉलिवूड व क्रीड क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची (Anant-Radhika pre wedding ceremony) चर्चा जगभरात गाजली. या सोहळ्यासाठी तब्बल 1000 कोटींचा खर्च करण्यात आला होता. प्री वेडिंग सोहळ्यात किंग खान शाहरुख (khan Shahrukh),सलमान खान (Salman khan),आमिर खान (Aamir khan) या कलाकारांनी एकत्र परफॉर्मन्स केला होता. त्याशिवाय, अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. काहींनी परफॉमदेखील केले होते. दीपिका-रणवीर, सारा अली खान, खूशी कपूर, जान्हवी कपूर यांसह अनेकांनी या कार्यक्रमात परफॉर्मन्स केला होता. पण, त्यापेक्षाही या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती खान मंडळीच्या नृत्याची. त्यामुळे आता त्यांनी नेमक किती मानधन घेतलं? हे जाणून घेण्याची उत्सूकता सर्वांनाच आहे. (हेही वाचा :Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Functions: अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची हजेरी)

3 मार्च रोजी अनंत- राधिका यांचा टस्कर ट्रेल्स आणि हस्ताक्षर कार्यक्रम पार पडला. टस्कर ट्रेल्स याद्वारे जामनगर, वनतारा फिरवण्यात आलं. त्यानंतर हस्ताक्षर कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी तब्बल 1000 कोटींचा खर्च पडला. तर, संध्याकाळच्या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी चार चाँद लावले. (हेही वाचा : Anant-Radhika Pre-Wedding: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीची हजेरी)

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात किंग खान शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या कलाकारांनी एकत्र परफॉर्म केला. शाहरुख हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत लग्नसोहळ्याला आला होता. मात्र, त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षाही त्यांच्या मानधनाबाबत भरपूर चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार तिन्ही खानांनी त्यांच्या परफॉर्मन्ससाठी एकही रुपया अंबानींकडून घेतला नाहीये. त्यांनी आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स केला होता. त्यावेळी या खान मंडळींसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण याने देखील परफॉर्मन्स केला होता. या परफॉर्मन्ससाठी त्यानेही कोट्यवधी रुपये घेतले असतील, असं म्हटलं जातं. पण त्यानेदेखील काहीच मानधन घेतलं नाही.

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने अंबानींच्या कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपये घेतल्याचे समोर आले आहे. रिहानाला तब्बल ५२ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय कॅटरिंगवर १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.