Amitabh Bachchan's Jhund to release on June 18: मराठी चित्रपटसृष्टीला सैराट, फँड्री यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund) चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटातून बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झळकणार असल्याची माहिती समोर आली, त्या क्षणापासूनच चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होणार? याचीच उत्सुकता पाहायला मिळाली. नुकताच नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात झुंड चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची माहिती दिली देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरने चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट याचवर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखांच्या अंदाजानंतर आता अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला आहे.

नागराज मंजुळे यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनीदेखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की कोरोनाने आपल्याला अनेक झटके देत मागे आणल आहे. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण अखेर त्या दिवसांमध्ये परतलो आहोत, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor स्टारर Luv Ranjan यांच्या चित्रपटाच्या रिलीज डेटची झाली घोषणा

नागराज मंजुळे यांची इंस्टाग्राम पोस्ट-

नागराज मुंजळे यांचा झुंड चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी कशाप्रकारे फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, अमिताभ बच्चन विजय बारसे यांची भूमिका साकारणार असल्यामुळे अनेकांना या चित्रपटाची उस्तुकता लागली आहे.