Alia Bhatt, Ranbir Kapoor And daughter Raha (PC-Yogen Shah)

Raha Kapoor: बॉलिवूडचे ट्रेंड सेटर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर दररोज इंटरनेटवर ट्रेंड होत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाला विचारण्यात आले होते की, आता ती स्वतः आई बनली आहे, ती तिचे पालक सोनी आणि महेश भट्ट यांच्या तुलनेत पालनपोषणाच्या बाबतीत काही वेगळे करेल का? यावर आलिया म्हणाली, मी फक्त एकच गोष्ट वेगळी करेन की राहाला काही कलेमध्ये रस आहे याची खात्री करेन. तिने किमान एक वाद्य, नृत्यकला आणि एक खेळ शिकला पाहिजे, कारण ही तीन कौशल्ये तिला दीर्घकाळासाठी खूप उपयुक्त ठरतील. मला माहित आहे की ,यात चूक किंवा बरोबर असे काहीही नाही, राहाने लहानपणापासूनच या कलांची आवड निर्माण करावी अशी माझी इच्छा आहे. मला एकच खंत आहे की, मला कोणतेही वाद्य कसे वाजवायचे ते माहित नाही."

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट शेवटची रणवीर सिंगसोबत करण जोहरीच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही चित्रपट यशस्वी झाला.