Photo Credit- X

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची नात आणि अक्षय कुमारची भाची नाओमिका सरन (Naomika Saran) दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात नाओमिका सरन ही बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांच्यासोबत दिसणार आहे. ज्यामुळे या चित्रपटाचा उत्साह आणखी वाढणार आहे. नाओमिकाचे हे चित्रपटसृष्टीत पदार्पण आहे. तर अगस्त्यने नेटफ्लिक्स इंडियाच्या 'द आर्चीज'मधून या पदार्पण केले होते. तो सध्या श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' वर काम करत आहे, जो युद्ध नायक अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे.

नाओमिका सरन आणि अगस्त्य नंदा यांची जोडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Peepingmoon (@peepingmoonofficial)

या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध पंजाबी चित्रपट निर्माते जगदीप सिद्धू करणार आहेत. जे जट्ट अँड ज्युलिएट ३ मधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आहेत. त्यांनी त्यांच्या कालेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये त्यांची नवी ओळख निर्माण केली होती. या दोन्ही सुपरस्टारांनी आनंद (1971) आणि नमक हराम (1973) सारख्या क्लासिक चित्रपटांमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती.