(व्हिडिओ) सायकलिंग करताना अक्षय कुमारने केला अनोखा स्टंट
अक्षय कुमार (Photo Credits : Twitter)

नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा अक्षय कुमार, त्याच्या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. तर अक्षय कुमार सध्या आपल्या ‘हाउसफुल – 4’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शुटींग जैसलमेर येथे होत आहे. शुटींगदरम्यान स्वतःसाठी थोडा वेळ काढून अक्षय कुमारने एक स्टंट केला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण, या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार सायकल चालवता चालवता बॉक्सिंग करताना दिसून येत आहे. बॉक्सिंग करताना अक्षय अतिशय जोरात सायकलचे पायडल मारताना दिसून येत आहे. हे सर्व करताना त्याने जो बॅलन्स साधला आहे तो वाखाणण्याजोगा आहे.

अक्षयने त्याच्या चाहत्यांना या व्हिडीओमध्ये केला गेलेला स्टंट तुम्ही करू नका, असा इशाराही दिला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने असे लिहिले आहे की, ‘तुमचा विश्वासही बसणार नाही इतका मी मुक्तपणाचा आनंद घेत आहे. जैसलमेरच्या वाळवंटातील रस्त्यावर मी हाताचा उपयोग न करता सायकल चालवली. बॅलन्स आणि स्थिरता म्हणजेच जीवन होय.’

‘हाउसफुल 4’मध्ये अक्षय कुमार सोबत कृती सेन, कृति खरबंदा आणि नाना पाटेकरसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 26 ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.