COVID-19: कोरोना मुळे 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनावर पडदा; नाट्य परिषदेने पुढे ढकलली तारीख

महाराष्ट्रव्यापी अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) यंदाच्या शतकपूर्ती संमेलनावर कोरोना व्हायरस मुळे तात्पुरता पडदा पडला आहे. यंदा 25 मार्च ते 14 जून या कालावधीत पूर्वनियोजित असणारे नाट्य संमेलन नाट्य परिषदेकडून पुढे ढकलण्यात आले आहे

मनोरंजन Siddhi Shinde|
COVID-19: कोरोना मुळे 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनावर पडदा; नाट्य परिषदेने पुढे ढकलली तारीख
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रव्यापी अखिल भारतीय मराठी संमेलन नाट्य परिषदेकडून पुढे ढकलण्यात आले आहे

मनोरंजन Siddhi Shinde|
COVID-19: कोरोना मुळे 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनावर पडदा; नाट्य परिषदेने पुढे ढकलली तारीख
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रव्यापी अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) यंदाच्या शतकपूर्ती संमेलनावर कोरोना व्हायरस मुळे तात्पुरता पडदा पडला आहे. यंदा 25 मार्च ते 14 जून या कालावधीत पूर्वनियोजित असणारे नाट्य संमेलन नाट्य परिषदेकडून पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबत नाट्य परिषदेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून माहिती देण्यात आली आहे. सांगली मध्ये यंदा नाट्य संमेलनाचे शतक पूर्ती संमेलन रंगणार होते. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मुंबई (Mumbai), पुणे (Pune) , ठाणे (Thane)  या ठिकाणी कोरोनाचे (Corona Virus) रुग्ण आढळून आले आहेत, या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तरी खबरदारीचा पर्याय म्ह्णून संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. अद्याप संमेलनाची पुढील तारीख सांगण्यात आलेली नाही.(दिल्ली सरकारकडून कोरोना व्हायरसमुळे राज्यात IPL 2020 चे आयोजन रद्द, मनीष सिसोदिया यांनी केले जाहीर)

प्राप्त माहितीनुसार, मराठी नाट्य संमेलनाचे यंदाचे 100 वे वर्ष असल्याने नाट्य प्रेमी आणि राजकीय स्तरावर सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळत होता. तंजावर, सांगली, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नाशिक बारामती, मुंबई सहित एकूण 13 ठिकाणी हे संमेलन रंगणार होते. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे संकट सुद्धा जोर पकडताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही शाळा कॉलेजना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमा होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. म्हणूनच आयपीएल सारखा मोठा सोहळा सुद्धा पुढे ढकलणार अशा चर्चा सुरु आहेत.

नाट्य परिषदेचे ट्विट

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे सह तब्बल 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे संकट रोखण्यासाठी नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच हॉस्पिटल मध्ये संशियत व बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

मराठी नाट्य संमलेनावर पडदा; नाट्य परिषदेने पुढे ढकलली तारीख',560,360,'issocial','https://marathi.latestly.com/entertainment/akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-is-postponed-due-to-wide-spread-corona-virus-110104.html');return false;" href="https://facebook.com/sharer.php?u=https://marathi.latestly.com/entertainment/akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-is-postponed-due-to-wide-spread-corona-virus-110104.html" title="Share on Facebook">
Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change