धक्कादायक : ड्रग्ज प्रकरणात या बॉलीवूड अभिनेत्याला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो)

बिग बॉस 7 फेम तसेच बॉलीवूड अभिनेता एजाज खान याला अंमली पदार्थांचे सेवन केल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार एजाज खानना बेलापूर परिसरातील के स्टॉर हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाबद्दल पोलिसांची चौकशी चालू आहे.

एजाजकडे 2.3 ग्रॅमच्या 8 अंमली पदार्थांच्या गोळ्या आढळून आल्या आहेत.

एजाज रक्‍त चरित्र आणि लव डे सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. अनेक सामाजिक मुद्द्यांवर एजाजने सरकारच्या विरोधात आवाजही उठवला होता.