Koffee With Karan मध्ये अजय देवगण ठरला Audi कारचा विजेता
Koffee With Karan मध्ये अजय देवगण ठरला Audi कारचा विजेता (Photo Credits-Twitter)

कॉफी विथ करण (Koffee With Karan) या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये उत्तम देणाऱ्या कलाकाराला ऑडी (Audi) कार मिळणार असल्याचे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. तसेच कोणता कालाकार उत्तम उत्तर देणारा ठरेल याची प्रेक्षकांना उत्सुकता सर्वांना लागून राहीली होती.

तर अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) ह्याला त्याने दिलेल्या उत्तरासाठी ऑडी कार विजेता म्हणून देण्यात आली आहे. या सीजमध्ये कजोल आणि अजय एकत्र आले होते. त्यावेळी एखाद्या अंश्रद्धेबद्दल सांगा ज्यामुळे तुला पश्चाताप होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर अजयने उत्तर देत असे म्हटले होते की, 'क' या शब्दाने सुरु होणारे करण जोहरचे सर्व चित्रपच सुपरहिट ठरतात. मात्र 'काल' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर जास्त चालला नसल्याने त्या दिवसापासून मला या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होत असल्याचे अजयने करण जोहरला उत्तर दिले होते.

कॉफी विथ करण सीजन 6 संपल्यानंतर रविवारी एक विशेष एपिसोडमध्ये कॉफी अवॉर्ड्स देण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी यावेळी उपस्थिती लावली होती.