Priyanka Chopra : 'युनिसेफ इंडिया फॅमिलीमध्ये स्वागत' करीना कपूर खान नॅशनल ब्रेंड ॲंबेसिडर होताच अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून स्वागत
Priyanka Chopra (PC- Facebook)

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान( Kareena Kapoor Khan) ची नुकतीच युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत (National Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युनिसेफ ही संस्था विविध देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहे. करीना कपूर गेल्या 15 वर्षांपासून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रात युनिसेफ इंडियाला मदत करत आहे. याआधी करीना कपूरची 2014 मध्ये युनिसेफ सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. करीना कपूर खानची युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत (National Ambassador) म्हणून नियुक्ती होताच अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra)ने तिचे हार्दिक स्वागत केले. (हेही वाचा :Shreyas Talpade : "आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही...", हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीबद्दल श्रेयस तळपदेकडून अनेक शंका उपस्थित )

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे, करीना कपूर खानचे स्वागत केले आहे. प्रियांका 2016 पासून जागतिक गुडविल ॲम्बेसेडर टीमसोबत जोडली गेली आहे. आता करीनाचे तिने स्वागत केले आहे. युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड किंवा युनिसेफची स्थापना करण्याचा प्रारंभिक उद्देश, द्वितीय विश्वयुद्धात नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हा होता. 11 डिसेंबर 1946 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याची स्थापना केली होती. पुढे 1953 मध्ये युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य बनला. युनिसेफला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 1965 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Kareena Kapoor Khan (Photo Credits: Priyanka Chopra's Instagram)