Neha Gadre-Ishan Bapat Wedding: 'मन उधाण वार्याचे' (Man Udhan Varyache), 'मोकळा श्वास' (Mokala Shwas), 'अजूनही चांदरात आहे' (Ajunahi Chandrat Aahe) यामधून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) विवाहबंधनात अडकली आहे. प्रियकर ईशान बापटसोबत (Ishan Bapat) नेहाने विवाह केला आहे. सोशल मीडीयामध्ये नेहा आणि ईशान यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कौंटुबिक आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये नेहा आणि ईशानचा विवाहसोहळा पार पडला.
'जय मल्हार' फेम सुरभी हांडे विवाहबद्ध (Photos)
नेहाच्या लग्नाचे आणि रिसेप्शन सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. नेहा आणि ईशानचं लग्न पुण्यामध्ये वैदीक पद्धतीने पार पडलं. मागील वर्षी 10 जुलैला नेहा आणि ईशानचा साखरपूडा झाला आणि 2 मार्च दिवशी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.