Maharashtra Assembly Election 2019: 'पण नक्की शेण कोण खातंय...' भारत जाधव यांचा राजकीय नेत्यांना सवाल
Bharat Jadhav (Photo Credits: Facebook)

मराठी अभिनेता भारत जाधव कायमच आपल्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जातो. परंतु यावेळी त्याने अचूक टायमिंग साधलाय ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांचं. भारतने आपले प्रश्न अत्यंत कठोर शब्दात मांडत सर्वच राजकीय पक्षांना एक सवाल विचारला आहे. 'पण नक्की शेण कोण खातंय' असा प्रश्न विचारात त्याने एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या समस्या या व्हिडिओमधून मांडल्या आहेत.

पहा हा व्हिडिओ-

भारतने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकॉउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सर्वात प्रथम देशातील आणि नंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा आराखडा वाचून दाखवला आहे.

व्हिडिओची सुरुवात त्याने 'भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे' अशा प्रतिज्ञेने केली. त्यानंतर त्याने 'आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण मोठमोठे करार करत आहोत, त्यामुळे आपलं भलं होणार आहे असं सांगितलं जातं. त्याचा अभिमानही आहे पण भलं नेमकं कोणाचं होतंय असा प्रश्न विचारला आहे. यावरच न थांबता त्याने रस्त्यांवरील खड्डे, सुधारणा करण्याच्या नावाखाली होणार भ्रष्टाचार अशाही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत,