प्रवीण तरडे नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुस्तक गपणती ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केले होते. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते.त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. यातच आरपीआय नेते यांनीही आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांच्यावर त्वरीत कारण्यात यावी अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
“प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या पुस्तकावर गणपती बसवून लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती”, अशा आशयाचे ट्विट सचिन खरात यांनी केले आहे. हे देखील वाचा- SP Balasubrahmanyam Health Update: सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक एस पी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर, मात्र अजूनही व्हेंटिलेटरवर
सचिन खरात यांचे ट्वीट-
प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती. @AnilDeshmukhNCP @satejp @DesaiShambhuraj #सचिनखरात_आरपीआय
— SACHIN KHARAT RPI (@RPIsachinkharat) August 23, 2020
'माझ्या घरी यंदा बाप्पासाठी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचे सर्वात मोठे प्रतिक अशी माझी भावना होती. असे असले तरी मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसेच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची सर्वांचीच जाहीर माफी मागतो', असे तरडे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले आहे.