SP Balasubrahmanyam Health Update: सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक एस पी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर, मात्र अजूनही व्हेंटिलेटरवर
S P Balasubrahmanyam (PC - Facebook)

आपल्या आवाजाने श्रोत्यांवर मोहिनी घालणारे ज्येष्ट पार्श्वगायक बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची प्रकृतीबाबात रुग्णालयाने अपडेट्स दिले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) ने ही माहिती दिली आहे. ते 74 वर्षांचे असून अनेक वैद्यकिय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बालासुब्रमण्यम यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती.

एमजीएम हेल्थकेअरच्या डॉ. अनुराधा भास्करन यांनी सांगितले की, बालासुब्रमण्यम अतिदक्षता विभागात असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्याचबरोबर ईसीएमओवर सुद्धा आहेत.

 

View this post on Instagram

 

Thanks for your prayers ...

A post shared by SP Balasubrahmanyam (@ispbofficial) on

ज्या वैद्यकिय टीमकडे बालासुब्रमण्यम यांच्यावर इलाज सुरु आहेत त्यांना बालसुब्रमण्यम यांना फुफ्फुसांचा रोग, संसर्गजन्य रोग, ईसीएमओ वर इलाज करत असल्याचे सांगत आहेत. 5 ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दजाखल करण्यात आले होते. दरम्यान, बालासुब्रमण्यम यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली होती. यात त्यांनी आपल्या मित्रांना फोन न करण्याची विनंती केली होती. याशिवाय दोन-चार दिवसात डिस्चार्ज मिळेल, असंही म्हटलं होतं.

बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून छातीत त्रास होत होता. तसचं थोडा खोकला आणि तापही येत होता. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर कोरोनाचं निदान झालं. डॉक्टरांनी मला होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. मात्र, मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला, असंही बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं.

बालासुब्रमण्यम यांनी गायलेली साथिया ये तूने क्या किया, हम आपके है कौन, दिल दिवाना ही गाणीही आजही लोकांच्या ओठावर कायम आहेत.