आमिर खान (Photo Credits : Instagram)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरुद्ध लढ्यासाठी पीएम केअर्स फंड (PM Cares Fund), मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हीड 19 फंड (CM Relief Fund COVID 19) , मध्ये मोठी मदत केली आहे तसेच आमिरने आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) च्या टीम मधील रोजंदारी कामगारांना सुद्धा आपल्या परीने आर्थिक मदत केली आहे. तसेच कलाविश्वातील कर्मचाऱ्यांसाठी एका एनजीओमध्ये निधी जमा केला आहे. या मदतीचे वैशिष्ट्य म्हणजे आमिरने आपलं केलेल्या मदतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही तर चित्रपट व्यवसाय समीक्षक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी आज केलेल्या ट्विट मधून याबाबत माहिती मिळत आहे. आमिरने गाजावाजा न करता आपले कर्तव्य बजावल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Coronavirus Outbreak: अभिनेता वरूण धवन निराधार, बेरोजगारांसोबत Covid 19 विरूद्धच्या युद्धात लढणार्‍या डॉक्टर, नर्सच्या जेवणाची सोय करणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे, याकाळात अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने हातावर पोट असणाऱ्या मंडळींच्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झाले आहेत. तसेच कोरोनावरील उपचारासाठी सुद्धा मोठ्याप्रमाणावर खर्च येत असल्याने देशाच्या आर्थिक स्थितीतही तणाव आहे, अशावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन आर्थिक साहाय्य करावे यासाठी पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली आहे, तसेच महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हीड 19 मार्फत नागरिकांची आर्थिक मदत स्वीकारली जात आहे. आतापर्यंत यासाठी अनेक कलाकार व उद्योगपतींनी कोट्यवधी रक्कमेचे योगदान दिले आहे, मात्र आमिरचे नाव या मदतगारांच्या यादीत आतापार्यंत कुठेच ऐकू आले नव्हते.

तरण आदर्श ट्विट

दरम्यान, बॉलिवूड मधील अनेक मंडळींनी आपापल्या परीने या कोरोनाच्या लढ्यात योगदान दिले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1 लाख मजुरांच्या महिन्याभराचा किराणा देणार अशी घोषणा केली आहे तर भाईजान सलमान खान याने सुद्धा चित्रपट व्यवसायातील रोजीनीशीवरील कामगारांना कोट्यवधींची मदत केली आहे. शाहरुख खान याने आपली एक चार मजली इमारत बीएमसीला कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी दिली होती. या लढ्यात सामान्य नागरिक सुद्धा शक्य तेवढी मदत करत आहेत या सर्व योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.