इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायलेट एफ 77 लाँच; चार्जिंग केल्यानंतर चालणार 150 किलोमीटर
Ultraviolette F77 Electric Motorcycle (PC - twitter)

बंगळुरूमधील 'अल्ट्राव्हायलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड'ने (Ultraviolette Automotive Private Limited) 'इलेक्ट्रिक बाईक एफ-77' (Ultraviolette F77 Electric Motorcycle) लाँच केली आहे. या बाईकची किंमत 3 ते 3.5 लाख रुपये आहे. बुधवारपासून या बाईकची प्रीबुकिंग सुरू झाली आहे. लाँचिंगअगोदर 100 बाईक बुक झाल्या आहेत.

या बाईकची डिलिव्हरी 2020 पासून सुरू होणार आहे. या बाईकमध्ये 25 केडब्ल्यूएच इलेक्ट्रिक मोटर मिळते. या बाईकचं इंजिन 33.5 एचपीचे असून ते 2 हजार 250 आरपीएम देते. सध्या ही बाईक तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. या बाईकची बॅटरी अतिवेगाने चार्ज होणार आहे. फुल चार्जिंग झाल्यानंतर ही बाईक 150 किलोमीटर चालणार आहे. (हेही वाचा - Royal Enfield  बाईकच्या किंमतीत वाढ; पाहा नवी किंमत)

या इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्ट्ये -

> व्हीलबेस -1240 एमएम

>सीट हाइट-800 एमएम

> कर्व्ह वेट- 158 किग्रा

> फ्रंट ब्रेक - 320 एमएम डिस्क

> रिअर ब्रेक- 230 एमएम डिस्क

> बॅटरी- लिथियम आयन बॅटरी पॅक

या बाईकमध्ये ट्रॅकिंग, राइड टेलीमेटिक्स, रायडिंग मोड्स, ऍपबेस्ड कनेक्टिव्हिटी, इत्यादी  फीचर्स  आहेत. या बाईकला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे अनेकांनी या बाईकचे बुकिंगही केले आहे. इलेक्ट्रिक बाईकमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून इंधन बचतदेखील होणार आहे.