TVS Jupiter 125 च्या सर्व मॉडेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक
टीवीएस ज्युपिटर (Photo Credits-Twitter)

गेल्या काही महिन्यांपासून वाहन उत्पादक त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की वाहन निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांच्या किमती गेल्या वर्षभरापासून सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसत आहे. या क्रमात, TVS ने त्यांच्या 125 cc स्कूटरच्या किमती 1,275 रुपयांनी वाढवल्या आहेत.  तर जाणून घ्या TVS Jupiter 125 च्या नव्या किंमतींबद्दल अधिक.(Mukesh Ambani यांनी खरेदी केली 13 कोटींची नवीन Rolls Royce SUV; व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले 'एवढे' रुपये)

या 125 cc TVS स्कूटरची किंमत जवळपास 1,275 रुपयांनी वाढली आहे. स्टील व्हीलसह TVS ज्युपिटर 125 ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत आता 74,4025 रुपयांवरून 75,625 रुपये झाली आहे, तर अलॉय व्हीलसह ज्युपिटर 125 ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 76,800 रुपयांऐवजी 78,125 रुपये असेल. तसेच टॉप-एंड TVS ज्युपिटर 125 डिस्क ब्रेक व्हेरिएंट  तुम्हाला 81,300 रुपयांऐवजी  82,575 रुपयांमध्ये घरी घेऊन जाता येणार आहे.

कंपनीची ही स्कूटर अतिशय स्टायलिश दिसणारे 125cc ज्युपिटर सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते, जे ट्रिप मीटर, ओडोमीटर, खराबी इंडिकेटर, इव्हरेज फ्यूल इकॉनोमी असे फिचर दिले आहेत. तसेच स्कूटरमध्ये एनालॉग स्पीडोमीटर आणि एलसीडी देखील देण्यात आला आहे. यात TVS IntelliGo स्टॉप-स्टार्ट सिस्टम, इकोनोमीटर, पॉवर मोड, सायलेंट स्टार्टसाठी इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर आणि साइड-स्टँड इनहिबिटर यांसारखी अत्याधुनिक फिचर्स देखील मिळणार आहेत.(Dual-Mode Vehicle: जपानने सादर केली जगातील पहिली ड्युअल-मोड बस; रस्त्यासह रेल्वे रुळांवरही धावणार Watch Video)

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास TVS ज्युपिटर 125 मध्ये 124.8 cc एअर-कूल्ड इंजिन आहे जे 6,000 rpm वर 8.04 bhp आणि 4,500 rpm वर 10.5 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या स्कूटरवरील सस्पेंशन ड्युटी टेलिस्कोपिक फोर्क्सद्वारे तीन-स्टेप अॅडजस्टेबल गॅस-चार्ज्ड मोनो-शॉकद्वारे प्रदान केल्या जातात, तर ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये मानक म्हणून 130 मिमी ड्रम ब्रेक आणि पर्यायी 220 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.