Toyota Urban Cruiser Booking: आजपासून Toyota Urban Cruiser चे बुकिंग सुरु, 11 हजार रुपये प्रती महिना द्यावे लागणार
Toyota (Photo Credits-Twitter)

Toyota Kirloskar Motor ची अपकमिंग एसयुव्ही Toyota Urban Cruiser ची बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. अरबन क्रुजर बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी 11 हजार रुपये टोकन रक्कम द्यावी लागणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या डीलरशिप्स येथे जाऊन बुकिंग करता येणार आहे. टोयोटा अर्बन क्रुजर बद्दल बोलायचे झाल्यास मारुति सुजुकी आणि टोयोटाचे कोलॅबेरेशनचे दुसरे प्रोडक्ट असणार असुन जे रीबैज करुन तयार केले आहे. रीबैजिंग मध्ये गाडीचे नाव बदले असून यामध्ये मोठे बदल सुद्धा केले आहेत.

कंपनी अर्बन क्रुजर खासकरुन तरुणांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. याची स्टायलिंग ते फिचर्स पर्यंतच्या गोष्टी तरुणांच्या पसंतीस पडू शकतात. याला अधिक स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीने काही बदल केले आहेत. माहितीनुसार, कंपनी फेस्टिव्ह सीझनमध्ये या एसयुव्ही लॉन्च करणार आहे.(Honda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये)

अर्बन क्रुजरमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जो 105PS ची पॉवर आणि 138Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्स लैस आहे. टोयोटाची अर्बन क्रुजर मध्ये ग्राहकांना सुझुकीचे SHVS माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञान मिळणार आहे. ते अर्बन क्रुजरच्या मॅन्युअल वेरियंटमध्ये Vitara Brezza च्या मॅन्युअलच्या तुलनेत अधिक मायलेज देणार आहे.

एक्सटीरियर बद्दल बोलायचे झाल्यास टोयोटा अर्बन क्रुजरमध्ये द्विन पॉड हेडलॅम्प, 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हिल, द्विन स्टेल ग्रिल, फॉक्स स्किड प्लेट क्रोम फ्रेम, रियरची बैजिंग सारखी एक्सटीरियर फिचर्स पहायला मिळणार आहेत. खरंतर एसयुवी विटारा ब्रेजाचे रीबैज मॉडेल आहे. पण ही एसयुवी Baby Fortuner च्या नावाने प्रमोट केली जात आहे.