Toyota Supra या कारचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?
Toyota Supra (Photo Credits- Twitter)

Toyota या प्रसिद्ध कंपनीच्या येणाऱ्या नवीन स्पोर्टकारचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडियावर पाहायला मिळाला आहे. तसेच Toyota Supra असे या कारच्या मॉडेलला नाव देण्यात आले आहे.

टोयोटा सुप्रा (Toyota Supra) ही टोयोटा कंपनीच्या स्पोर्टकारमधील नवं मॉडेल आहे. या कारचे डिझाईन 2014 FT-1 ची आठवण करुन देते. तसेच कारच्या वरील बाजूस काचेचे आवरण देण्यात आले आहे. परंतु कारचा पुढील भाग टोयोटा कंपनीने नाकाच्या आकाराचा बनविला आहे. तर टोयोटो सुप्राचे हे मॉडेल जवळजवळ BMW Z4 सारखेच असल्याचे सांगितले जात आहे.

या कारचे डिझाइन ऑस्ट्रियामधील मॅगना स्टीयर यांच्या तर्फे बनविले आहे. कारच्या इंजिनमध्ये टेबोचार्ज्ड 4 आणि 6 सिलिंडर यूनिट अशी रचना असणार आहे. तर कारचे पावर आऊटपुट 200 ते 335bhp असे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.