भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचा वापर केला जातो. हेच कारण आहे की बहुतांश जण दुचाकी चालवताना काही वेळेस वाहतूकीचे नियम विसरतात आणि अपघाताचे शिकार होतात. खरंतर पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. तर काही वेळेस लोक हेल्मेट शिवाय सुद्धा गाडी चालवताना अचानक झालेल्या दुर्घटनेत आपला जीव गमावतात.(नव्या Beneli 320R मध्ये मिळणार अधिक स्पोर्टी लूकसह हे खास फिचर्स)
सध्या रस्ते सुरक्षा वाढवण्यासह मोटर चालकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी राजस्थान सरकारने एक निर्णय घेतला आहे. तर प्रत्येक वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सुद्धा गाडीसोबत फ्री दिले जाणार आहे. पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी या संबंधित प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात दुचाकी वाहनांच्या डिलर्सला मोटरसायकल आणि स्कूटर खरेदी करणाऱ्याला फ्री मध्ये हेल्मेट दिले जावे.
राज्य सरकारने या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात घोषणा केली होती की राज्यात सर्व नव्या दुचाकी वाहनांना हेल्मेट अनिवार्य असणार आहे. ही घोषणा राजस्थानच्या सरकारकडून केली गेली होती. बातमीनुसार, राजस्थानचे वाहतूक मंत्र्यांने राज्यात दुचाकी डिलर्स सोबत बैठक घेतली. त्यानंतर दुचाकी वाहनांच्या खरेदीवर हेल्मेट फ्री देण्यास त्यांनी मान्य केले आहे. तर हेल्मेटवर आयएसआय चिन्ह असणे महत्वाचे आहे. (Fake Driving License : तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? घरबसल्या ऑनलाईन असं करा चेक)
भारतात प्रत्येक वर्षाला रस्ते अपघातातील मृतांचा आकडा वाढल्याचे दिसून येते. मात्र जर वाहन चालकाने जर हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अपघातात गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक कमी होते. परंतु जर हेल्मेट न घालता गाडी चालवल्यास वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यासोबत 1 हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला जातो.