नव्या Beneli 320R मध्ये मिळणार अधिक स्पोर्टी लूकसह हे खास फिचर्स
Beneli 320R (Photo Credits-Twitter)

Beneli 320R ग्लोबली झळकवण्यात आली आहे. तर बेनली ही एन्ट्री लेव्हल फुल फेयर्ड मोटरसायकल काही बदलावांसह मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे. आपल्या नव्या बदलावांमुळे मोटरसायकल यापूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी दिसून येणार आहे. तसेच जुन्या मॉडेलपेक्षा बेनली 302आर चे डिझाइन अधिक उत्तम असणार आहे. लूक्स आणि डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास बाइकच्या एक्सटीरियरमध्ये शार्प दिसणारी बॉडी पॅनल्स, फ्रंट हेडलॅम्प्स च्या जागी आता वर्टिकल प्रोजेक्टर लॅम्प लावण्यात आले आहेत. या बाइकच्या दोन्ही साइडला LED टर्न इंडिकेटर्स दिले गेले आहेत.(ट्रायम्फने भारतात लॉन्च केली Bonneville ची नवी रेंज, किंमतीसह फिचर्मध्ये करण्यात आले बदल)

तर फ्यूल टँक आधीपेक्षा अधिक मजबूत दिला गेला आहे. जर टेल सेक्शन बद्दल बोलायचे झाल्यास या आधीपेक्षा अधिक शार्प लूक देणार असून आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा अधिक उत्तम आहे. एग्जॉस्ट बद्दल बोलायचे झाल्यास ते जुन्या मोटरसायकल सारखेच ठेवण्यात आले आहे.Benelli ने दावा केला आहे की, त्यांनी मोटरसायकलच्या एका फ्रेममध्ये बदलाव केला आहे. जो आधीच्या तुलनेत अधिक हलका आहे. मोटरसायकल वजन सुद्धा कमी झाले असून ती आता 182kg झाली आहे.(Mahindra XUV700 ठरणार कंपनीची नवी 7 सीटर SUV, प्रीमियम फिचरसह जाणून घ्या काय असणार खास)

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास मोटरसायकलमध्ये आधीसारखेच इंजिन दिले गेले आहे. जो 302cc चे पॅरलल द्विन इंजिन दिले असून BS6 नॉर्म्स अनुरुप आहे. तर हे इंजिन 34bhp ची कमीतकमी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. अन्य फिचर्स मध्ये बाइकच्या फ्रंटला ग्राहकांना 41mm दिले जातात जे प्री-लोडेड अॅडजेस्टेबिलिटीसह येतात. या फोर्क्ससह मोटरसायकलमध्ये ग्राहकांना मोनो शॉक संस्पेशन सुद्धा दिले जाणार  आहेत.