PAL-V Car (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील पहिली 'फ्लाय अँड ड्राईव्ह' (Fly And Drive) कार बुधवारी मियामी 2020 अँड ब्रॉन्ड 'कार्यक्रमात लॉन्च करण्यात आली. या गाडीला पायोनियर पर्सनल एअर लँडिंग व्हेईकल (PAl-V) असे नाव देण्यात आले आहे. यात रिट्रॅक्टेबल ओव्हरहेड आणि रियर प्रोपेलर आहे, ज्याच्या मदतीने ही गाडी 12,500 फूट उंचीपर्यंत उडू शकते. पीएएल-व्ही कार हवेत 321 किमी प्रतितास वेगाने आणि रस्त्यावर 160 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. टू-सीटर या कारमध्ये 230 हॉर्सपॉवर इंजिन आहे. महत्वाचे म्हणजे या गाडीची किंमत सुमारे 4..30 कोटी रुपये आहे.

आतापर्यंत ही गाडी 70 लोकांनी बुक केली आहे. या गाडीची पहिली डिलिव्हरी 2021 मध्ये केली जाईल. कंपनीने यासाठी एक अट ठेवली आहे, त्याअंतर्गत खरेदीदारास ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पायलट लायसन्स असणे आवश्यक आहे. या दोन सीटर कारमध्ये 230 हॉर्सपॉवरचे चार सिलेंडर इंजिन आहे. ही गाडी अवघ्या 10 मिनिटांत थ्री व्हील कारमधून एका जायरोकॉप्टरमध्ये बदलते. यामध्ये इंधन म्हणून पेट्रोलचा वापर केला गेला आहे. कार्बन फायबर, टायटॅनियम आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या या कारचे वजन 680 किलो आहे. या गाडीत 27 गॅलन गॅसची टाकी आहे, जी 500 किमी पर्यंत उडण्यास परवानगी देते, तर रस्त्यावर ही गाडी 1200 किमी पर्यंत धावू शकेल.

या गाडीला उड्डाण करण्यासाठी 540 फुटाचा रनवे, आणि उतरण्यासाठी अवघ्या 100 फूट धावपट्टीची आवश्यकता आहे. यात मोटरसायकलसारखे हँडलबार आहे, त्याच्या मदतीने हे (रस्ता आणि उड्डाण) दोन्ही नियंत्रित केले जाऊ शकते. कंपनीने याचे प्रॉडक्शन व्हर्जन तयार केले आहे, ज्याची किंमत 4.30 कोटी रुपये आहे. कंपनी याचे स्वस्त व्हर्जन पाल-व्ही लिबर्टी स्पोर्टदेखील तयार करत आहे. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या मते, याच्या प्रत्येक युनिटची क्षमता आणि सामर्थ्य तपासण्यासाठी किमान 150 तास उड्डाण केले जाते.