टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने यंदा लॉन्च केलेल्या कार्सपैकी हैरियर एसयूवी कार ग्राहकांच्या चांगलीच पसंतीला आली. या कारने भारतीय बाजारात भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर टाटा मोटर्स आता पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या काही कार्स लॉन्च करण्याच्या विचारात आहेत. ज्यात काही नव्या मॉडेल कार आहेत. तर, काही जुन्याच कार्सचे नवे व्हर्जन आहे. जाणून घेऊया टाटा मोटर्सच्या या नव्या 7 कारबाबत
टाटा अल्ट्रॉज
टाटा मोटर्स कंपनीची टाटा अल्ट्रॉज ही एक बहुप्रतिक्षित आणि प्रीमियम हैचबॅक कार आहे आहे. ही कार यंदाच्या फेस्टिव्हल सीजनमध्ये लॉन्च होईल. ही कार यंदाच्या सप्टेबर महिन्यात बाजारात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कार ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या 45X कॉन्सेप्टचे व्हर्जन आहे. तीन इंजिन ऑप्शनमध्ये ही कार बाजारात उतरवली जाऊ शकते. ज्यात दोन पेट्रोल आणि एका डीजल इंजिन व्हर्जनचा समावेश असेल. ही कार मारुती बलेनो, ह्युंदाई एलीट आय 20 आणि टोयोटा ग्लैंजा या कारला टक्कर देऊ शकेल.
7 सीट वाली नवी एसयूवी (Buzzard)
या वर्षाच्या सुरुवातीला जिन्हेवा मोटार शोमध्ये टाटा मोटर्सने Buzzard नावाने 7 सीटवाली एसयूव्ही सादर केली होती. ही कार भारतीय बाजारात उपलब्ध 5 सीटवाली हैरियर एसयूव्ही चे 7 सीटर व्हर्जन आहे. बजार्डमध्ये तीसरी लाईन सीटसाठी हीची लांबी हैरियरच्या तुलनेत 62mm इतकी अधिक आहे. ही कार 2020 च्या सुरुवातीला दुसऱ्या नावाने लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. कारण की बजार्ड हे नाव या कारला केवळ जिन्हेवा मोटर शोसाठी देण्यात आले होते. (हेही वाचा, लवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)
टाटा हैरियर बीएस6, ऑटोमैटिक
टाटा मोटर्स आपल्या पॉप्यूलर एसयव्ही हैरियर चे अपडेटेड व्हर्जन सन 2020 च्या सुरुवातीला लॉन्च करेन. यात बीएस 6 इंजिन असेन. जे सध्यास्थितीत मॉडेलपेक्षा पॉवरफूल असेन. याशिवाय अपडेटेड हैरियर मध्ये 6- स्पीड ऑटोमॅटीक गियरबॉक्स पर्याययही असेन. ज्याची प्रदर्घ काळापासून उत्सुकता होती. या कारमध्ये काही मॅकेनिकल बदलांसोबत अपडेटेड हैरिअर सनरुफही असेन. 1.2-लीटर बीएस6 पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे.