Suzuki Burgman Street 125 BS6 भारतात लॉन्च; पहा स्टायलिश लूक आणि फिचर्स
Burgman Street (Photo Credits: Twitter)

सुझुकी मोटारसायकल इंडिया (Suzuki India) या कंपनीने स्टायलिश स्कूटर Burgman Street 125 BS6 चे नवे अपडेटेड मॉडल लॉन्च केले आहे. दिल्लीच्या एक्स शोरुम मध्ये या नव्याकोऱ्या स्कूटरची किंमत 77900 रुपये आहे. कंपनीने नव्या अपडेट्स सह स्कूटर नव्या रंगामध्ये सादर केली आहे. हे नवे व्हर्जन इको फ्रेंडली असण्यासोबतच स्मूथ रायडिंगचा अनुभव देईल, असा दावा सुझुकी कंपनीने केला आहे.

इंजिनची विशेषता:

सुझुकी बीएस-6 बर्गमॅन स्ट्रीट 125 मध्ये फ्यूल इंजेक्शन सिस्टम, इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट आणि किल स्विच देखील दिले आहे. जुलै 2018 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या या स्कूटरने चांगली लोकप्रियता मिळवली असून याच्या विक्रीतही चांगलीच वाढ झाली आहे. ही स्कूटर Activa 6g सह इतर 125cc स्कूटर्संना चांगलीच टक्कर देत आहे.

यात फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलजी सह यात 124cc सिंगल-सिलेंडर ऑल- अॅल्युमिनियम इंजिन देण्यात आले आहे. यामुळे थंडीतही स्कूटर अगदी सहज स्टार्ट होते. हे इंजिन 8.7 हॉर्स पावर आणि 10Nm पीक जनरेट करतं.

Suzuki Motorcyle India Tweet:

फिचर्स:

अपडेटेड बर्गमॅन स्ट्रीट चार रंगात उपलब्ध आहे. मेटॅलिक मॅट, फायब्रॉयन ग्रे, पर्ल मिराज व्हाइट, मॅटेलिक मॅट ब्लॅक नंबर 2 आणि मॅटेलिक मॅट बोरड्यो रेड हे रंगांचे ऑप्शन्स आहेत. LED हेडलॅंप, LED फेअरिंग लाईट्स, LED ब्लिंकर्स आणि LED डेटाईम रनिंग लेंप्स या सुविधा असून स्कूटरची ब्रेकिंग चांगली होण्यासाठी कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

याशिवाय स्कूटरमध्ये उंची विंडस्क्रीन, फ्लेक्सिबल फुट पोजिशन, आरामदायी सीट, डीसी सॉकेट सह फंक्शनल ग्लव बॉक्स यांसारख्या फिचर्स मुळे स्कूटर अगदी खास झाली आहे.