Simple One Electric Scooter उद्या होणार भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
Simple One Electric Scooter (Photo Credits-Twitter)

भारतात उद्या सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) लॉन्च केली जाणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर स्पोर्टी असण्यासह हाय रेंजसह मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे. त्यानंतर या स्कूटरची बुकिंग सुरु होणार आहे. 1947 रुपयांचे टोकन देऊन ही स्कूटर ग्राहकांना बुक करता येणार आहे. Simple One ची थेट टक्कर Ola Electric  स्कूटर सोबत होणार आहे. तर जाणून घ्या या स्कूटरच्या किंमतीसह खासियत बद्दल अधिक.(Hyundai Launch I20 N line: ह्युंडाईची आय 20 एन लाइन 24 ऑगस्टला येणार बाजारात, जाणुन घ्या कारची वैशिष्ट्ये)

कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्या टप्प्यात ज्या राज्यात लॉन्च केली जाणार आहे. त्यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब यांचा समावेश आहे. सिंपल एनर्जी यांनी असे म्हटल आहे की, त्यांनी या राज्यातील शहरांमध्ये एक्सपीरियंस सेंटर्ससाठी ठिकाण फायनल करत आहे. त्यामुळे याचा विस्तार केला जाऊ शकतो. कंपनीची योजना पुढील दोन वर्षात संपूर्ण देशात उपस्थिती वाढवण्यासाठी 350 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची आहे.

बॅटरी आणि रेंज बद्दल बोलायचे झाल्यास Simple One Electrci Scooter मध्ये 4.8k लिथियम-आयन बॅटरी मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही उत्तम बॅकअप देणार आहे.  म्हणजेच ही स्कूटर वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नाही आहे. स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर इको मोड मध्ये 240 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. सिंपल वन स्कूटर बद्दल असे बोलले जात आहे की, 3.6 सेकंदात 50 किमी प्रति तास वेग पकडण्यास सक्षम आहे. याची टॉप स्पीड 100 किमी प्रति तास असणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात सध्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा अधिक रेंज देण्यास सक्षण आहे. अशातच ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सिंपल वन ही टक्कर देणारी ठरणार आहे.