रेनॉल्ट कंपनीच्या कारच्या किंमती येत्या जानेवारी महिन्यापासून वाढणार आहेत. तर उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेनॉल्ट इंडिया यांनी असे म्हटले आहे की, विविध कारच्या मॉडेल्सवरील किंमती त्यानुसार बदलण्यात येणार आहेत. रेनॉल्टची भारतीय बाजारात Kwid सुरुवात होते. जे एक बजेट सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग हॅचबॅक आहे. Renault Captur सारखी SUV च्या माध्यमातून कंपनी भारतात आपले अस्तित्व दाखवून देते.
रेनॉल्ट क्विड या कारची सुरुवाती किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तर रेनॉल्ट कॅप्टरची सुरुवाती किंमत 12.99 लाख रुपये आहे. नव्या वर्षात अन्य कार उत्पादन कंपन्या त्यांच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. यामध्ये मारुती सुझुकी आणि मर्सिडिज, टोयोटा सारखे बडे ब्रॅन्ड सुद्धा सहभागी आहेत. Renault Triber ही 7 सीटर कार आहे. ज्याची भारतात 18,5000 मॉडेल्सपेक्षा अधिक विक्री झाली आहे. कंपनीने यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ही कार लॉन्च केली होती. तर रेनोच्या विक्रीत 56 टक्क्यांनी अधिक वाढ झालीआहे. या कारची नोव्हेंबर महिन्यात 10,882 युनिट्सची विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.(गाडी खरेदी करण्यासाठी हाच उत्तम वेळ, कंपन्या देतायात बंपर डिस्काउंट)
तसेच 2019 चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स दिल्या जात आहेत.
Google वर 2019 मध्ये सर्वात जास्त 'या' कार बद्दल करण्यात आले सर्च, जाणून घ्या खासियत
खुशखबर! Nokia 4.2 स्मार्टफोन मिळतोय अर्ध्या किंमतीत; पाहा कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर - Watch Video
5 टक्क्यांपासून ते 15 टक्क्यांपर्यंत सुट नव्या कार खरेदीवर दिली जात आहे. इंडस्ट्रीचे तज्ञ असे म्हणतात की, जानेवारी महिन्यापासून गाड्यांचे दर वाढणार आहेत. कारण नव्या गाड्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे.