OLA Electric Cabs लवकरत भारतात होणार लॉन्च, कमी खर्चात करता येणार लांब पल्ल्याचा प्रवास
ओला उबेर टॅक्सी संप ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

अॅप बेस्ड टॅक्सी प्रोव्हायडर कंपनी Ola लवकरच भारतात त्यांची Ola Electric Four Wheeler लॉन्च करण्याची शक्यता आहे. तर भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळत आहे. अशातच कंपनीने भारताच्या रस्त्यांवर त्यांची इलेक्ट्रिक फोर व्हिलर्स उतरवण्याचा विचार केला आहे. दरम्यान ओला इलेक्ट्रिक फोर व्हिलर्सचे काही फोटो सुद्धा समोर आले आहेत. या फोटोंमधून असे दिसते की, ओला इलेक्ट्रिक आकाराने लहान असणार आहे. ही कार चीप मोबिलिटी सोल्यूशनच्या आधारावर मार्केटमध्ये उतरवली जाऊ शकते. ज्यामुळे भारतीयांना कमी खर्चात लांब पल्ल्याचा प्रवास करता येर आहे. इलेक्ट्रिक वाहन असल्याने प्रदुषण होण्याची शक्यताच नाही आहे. त्याचसोबत इलेक्ट्रिक वाहने ही इंधन वाहनांपेक्षा कमी खर्चिक असतात.

इलेक्ट्रिक फोर- व्हिलर पूर्वी ओला भारत मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिसर लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी जानेवारी 2021 मध्ये अधिकृतरित्या आपली पहिली ई स्कूटर लॉन्च करु शकते. असे बोलले जात आहे की, सुरुवातीला या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती नेदरलँड्स स्थित प्रोडक्शन प्लांट मध्ये केला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि युरोपातील मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. मात्र कंपनीकडून याबद्दल अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.(Volkswagen कंपनीने झळकवले त्यांच्या पॉवरफुल 2021 Tiguan R कारचे मॉडेल, किंमतीसह फिचर्स बद्दल घ्या जाणून)

असे बोलले जात आहे की, कंपनी भारतात इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्यासाठी विविध राज्य सरकारसोबत बातचीत करत आहे. हा भारतातील सर्वाधिक मोठा इलेक्ट्रिक स्कूटर प्रोडक्शन प्लांट असणार आहे. या प्लांट मधून प्रत्येक वर्षाला 2 मिलियन इलेक्ट्रिक स्कूटर्सचे प्रोडक्शन केले जाणार आहे.

तर यंदाच्या वर्षातील मे महिन्यातच ओला इलेक्ट्रिकने Amsterdam स्थित असलेल्या इरटिगो बिवी ला टेकओव्हर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कंपनीने भारतात 2021 पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी वाहने लॉन्च करण्याचा विचार केला होता. भारतात इलेक्ट्रिक मोबिलीटीची वाढती मागणी पाहता कंपनी पूर्णपणे यासाठी तयार आहे.