भारतात लवकरच येणार अधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, एकदा चार्ज केल्यानंतर 240km चे अंतर कापणार
(Photo Credit: Twitter)

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट मध्ये अद्याप दोन स्कूटर Bajaj Chetak आणि TVS iQube बद्दलच ऐकायला मिळते. परंतु आता लवकरत बंगळुरु स्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी सिंपल एनर्जी आपली नवी स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने घोषणा केली आहे की ते येणाऱ्या महिन्यांमध्ये आपली प्रमुख स्कूटर भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या स्कूटरला Mark-2 नावाने भारतात येत्या मे महिन्यात लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनीने स्कूर बद्दल बोलताना असे म्हटले की, प्री सीरड फंडिंगमध्ये ठरवलेली रक्कम जमवण्यासाठी यशस्वी झाले आहेत. सिंपल एनर्जी Mark-2 देशातील ब्रॅंन्ड प्रमुख स्कूटर असणार आहे. मार्क 2 इलेक्ट्रिक स्कूटर सुरुवातीला भारतातील काही शहरातच उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये बंगळुरु, दिल्ली नंतर चैन्नई, मुंबई आणि हैदराबाद येथे ती उपलब्ध होणार आहे.

या स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंज बद्दल असा दावा केला जात आहे की, ही सिंगल चार्जमध्ये ईको मोडवर 240 किमी अंतर रेंज देण्यास सक्षम असणार आहे. या मध्ये कंपनी 4.8k चे लिथियम आयन बॅटरीचा वापर करणार आहे. याचा टॉप स्पीड 1000kmph असणार असून प्रति 3.6 सेकंदात 0.50 किमी प्रति तास स्पीड पकडू शकणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की, त्यांची मार्क-1 स्कूटर 230 किमी हून अधिक ARAI प्रमाणित ड्रायविंग रेंजसह येणार आहे. तर मार्क-1 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4Kwh च्या बॅटरी पॅकचा वापर केला गेला आहे.(Bajaj Chetak ला टक्कर देण्यासाठी सुझुकी घेऊन येणार नवी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या अधिक)

सध्या भारतात Bajaj Chetak, TVs iQube आणि Ather450x सारखे इलेक्ट्रिक स्कूट आपल्या ड्रायव्हिंग रेंजसाठी पॉप्युलर आहे. मात्र रिपोर्ट मध्ये या स्कूटरच्या तुलनेत मार्क 2 अधिक रेंज देणारी असणार आहे. त्याचसोबत स्टायलिश आणि स्पोर्टी डिझाइन लैस असून जी किंमती बद्दल भारतात Ather 450x ला टक्कर देणार आहे.