भारतात फक्त 24 लोक खरेदी करु शकतात 'Mini Countryman Black Edition' ची खास कार, 42.40 लाख रुपये किंमत
Mini Countryman Black Edition (Photo Credits-Twitter)

भारतात सणासुदीचे दिवस पाहता MINI India यांनी कंट्रीमॅन मधील एक नवे लिमिटेड अॅडिशन सादर केले आहे. तर Mini Countryman Black Edition ची एक्स शोरुम किंमत 42.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारची खासियत म्हणजे कंपनीने या अॅडिशन मधील फक्त 24 काळ्या रंगाच्या गाड्या तयार केल्या आहेत. कंट्रीमॅन ब्लॅक अॅडिशन कूपर एस (Cooper S) जॉन कूप वर्क्स (JCW) पासून प्रेरित वेरिंट आहे. तसेच स्टॅन्डर्ड मॉडेलपेक्षा याची किंमत जवजवळ लाख रुपयांनी जास्त आहे.

कंपनीने काही कॉम्समॅटिक अपग्रेड्स केले आहेत. त्याचसोबत एक्सटिरियर बाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये ब्लॅक ग्रिल, JCW कार्बन फायबर फिनिशिंग ORVMs, हेडलाइट आणि टेललाइटसह पिआनो ब्लॅक ट्रिम देण्यात आले आहे. त्याचसोबत टेलगेटसाठी ही पिआनो Black Counterman Moniker दिले आहे. कंट्रीमॅन ब्लॅकच्या बोनेट स्ट्रिप्स आणि रुफ रेल्स सुद्धा काळ्या रंगाचे असणार आहेत.या लक्झरी कॉम्पेट SUV मध्ये 18 इंचाचे JCW अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.(Maruti Suzuki S-Presso Mini SUV Launch: देशातील सर्वात स्वस्त SUV एस प्रेसो लॉन्च, किंमत, फिचर्स घ्या जाणून)

तसेच कारच्या इंटिरियर मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये हेड-अप डिस्प्ले, मिनी वायर्ज पॅकेज, इलेक्ट्रिक स्पोर्ट्स सीट्स, पॅनारोमिक ग्लास रुफ आणि Harman and Kardon ची साउंड सिस्टिम देण्यात आला आहे. ही कार एक स्पोर्टियर व्हर्जन आहे त्याच्या मॉडेल पॅकेज अंतर्गत JCW Aero Kit, ऑटोमेटिक टेलगेट एक्सेसस,सीट्ससाठी मेमोरी फंक्शन दिले आहेत.

Mini Countryman Black Edition  मध्ये 2.0 लीटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. जे 189hp ची पॉवर आणि 280Nm चे पीक टॉर्क जनरेट करु शकतात. या कारमध्ये पॅडल शिफ्टरसह 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह 0-100 किमी प्रति तास प्रमाणे 7.5 सेकंदाच्या वेगाने धावणार आहे.