International Women's Day 2019 निमित्त Maruti Suzuki ची महिलांसाठी स्पेशल ऑफर
Maruti Women's Day Camp Announced (File Photo)

जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day) मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीने सर्व्हिस कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्प अंतर्गत महिला कारधारकांना खास ऑफर्स मिळणार आहेत. 8 ते 31 मार्च दरम्यान तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

यात महिला ग्राहकांना कॉम्पलिमेंटरी सर्व्हिस व्हाऊचर्स, डिस्काऊंट्स दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ड्राय वॉश, फ्री व्हेहीकल पिक अप, ड्रॉप फॅसिलिटी देण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात तब्बल 1.5 लाख महिला ग्राहक गाड्या सर्व्हिसिंग करुन घेत असतात. त्यामुळे या महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमधून त्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा मिळाव्यात असा उद्देश आहे. International Women’s Day 2019 निमित्त 'विस्तारा एअरलाईन्स'ची फ्री सॅनिटरी पॅड्स पुरवण्याची नवी सुविधा

या कॅम्पबद्दल मारुती सुझुकीचे डिरेक्टर पार्थो बनर्जी म्हणाले की, "महिला ग्राहकांप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त या खास कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या सर्व्हिस कॅम्पमध्ये 18 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे यंदा अधिकाधिक महिला ग्राहक या सर्व्हिस कॅम्पचा लाभ घेतील, अशी आशा आहे."