Maruti Suzuki S-Presso CNG Car: मारुती सुझुकीने S-Presso CNG कार लाँच केली आहे. मारुतीने या सीएनजी कारचे चार LXi, LXi(O), VXi आणि VXi(O) असे व्हेरिअंट बाजारात आणले आहेत. मारुती सुझुकी सीएनजी, एस-प्रेसो कारची किंमत 4.84 लाखांपासून सुरु होते. यातील LXi व्हेरिअंटची किंमत 4.84 लाख, LXi(O) ची किंमत 4.90 लाख, VXi ची 5.08 लाख आणि VXi(O) ची 5.14 लाख रुपये आहे.
दरम्यान, मारुतीची ही नवीन कार एस प्रेसो सीनएजीवर 31.2 किमी प्रति किलोमीटरचे मायलेज देते. तर बाजारात आधीपासूनच असलेल्या पेट्रोल मॉडेलचं STD आणि LXi व्हेरिअंट 21.4 किमी आणि VXi व VXI+ व्हेरिअंट 21.7 किलोमीटरचे मायलेज देते. या कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. (हेही वाचा - Honda कंपनीच्या 'या' दोन गाड्यांवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1 लाख रुपयांची सूट)
या कारचे इंजिन 67 एपपीची ताकद आणि 90 एनएमचा टॉर्क निर्माण करते. तसेच सीएनजी मोडवर हे इंजिन 58 एचपी ताकद आणि 78 एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये केवळ 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये बदल करण्यात आले आहेत. S-Presso CNG मध्ये फॅक्ट्री फिटेड किट व्यतिरिक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (हेही वाचा - Kia Seltos ची इलेक्ट्रॉनिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक )
मारुती सुझुकीच्या S-Presso CNG कारमध्ये व्हेरिअंटनुसार पेट्रोल मॉडेलमध्ये फिचर असणार आहेत. या कारच्या मायक्रो एसयुव्हीमध्ये मिनी कूपरसारखे सर्क्युलर सेंटक कन्सोल, स्मार्ट प्ले डॉक आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या कारमध्ये सुरक्षेसाठी ड्रायव्हर साईड एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्, चाईल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक आदी देण्यात आले आहे.