| Image only representative purpose (Photo Credits: File Photo)

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India)  आपल्या काही मॉडल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे काही मॉडेल्सच्या किमतीत 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कार तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने मारुती कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत वाहनांच्या किमतीत 4.7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती कंपनीने जाहीर केलेले नवे दर 27 जानेवारी 2020 पासून लागू केले जाणार आहेत. तुम्हीही मारुती कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. चला तर मग कोणत्या मॉडल्सच्या किमतीत किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे ते पाहूयात... (हेही वाचा - वाहन चोरी झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला उशिराने माहिती दिल्यास क्लेमचे पैसे द्यावेच लागणार: सुप्रीम कोर्ट)

दिल्लीतील शोरूममध्ये मॉडल्सच्या किमतीत करण्यात आलेली वाढ -

  • अल्टो मॉडल - 6,000 ते 9,000 रुपयांपर्यंत वाढ
  • वॅगन आर - 4,000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढ
  • अर्टिगा - 4,000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढ
  • बलेनो - 3,000 ते 8,000 रुपयांपर्यंत वाढ
  • एक्सएल6 - 5,000 रुपयांपर्यंत वाढ
  • एस प्रेसो - 1,500 ते 8,000 रुपयांपर्यंत वाढ

वरील कारच्या किंमती दिल्लीतील शोरूममधील आहेत. मारुतीच्या अल्टो कारची सुरुवाती किंमत 2.89 लाख रुपये आहे तर एक्सएल 6 ची किंमत 11.47 लाख रुपये आहे. मागच्या वर्षी मारुती सुझुकी कंपनीच्या कारच्या विक्रीत घट झाली होती. आता कंपनीने आपल्या विविध कारच्या मॉडल्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.