मारुती सुझुकी ( Maruti Suzuki ) कंपनीची ‘जिप्सी’(Gypsy) आता बाजारात उपलब्ध होणार नाही. जिप्सीचं उत्पादन अधिकृतपणे बंद केल्याची माहिती देण्यात आली आहे. Rushlane च्या एका अहवालानुसार कंपनीने आपल्या डिलर्सना इ-मेलद्वारा माहिती दिली आहे. ‘कंपनीने जिप्सीच्या सर्व व्हेरिअंट्सचं उत्पादन तातडीने बंद केलं आहे, त्यामुळे डिलर्सनी ग्राहकांकडून या गाडीसाठी बुकिंग घेऊ नये’, अशाप्रकारचा मेसेज देण्यात आला आहे. एप्रिल 2019 मधये जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार new crash test norms and regulations ची पूर्तता जिप्सी करू शकत नसल्याने या गाडीचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेण्ययात आला आहे.
1985 मध्ये जिप्सी (डिझेल एसयुव्ही) पहिल्यांदा बाजारात आली होती. कालांतराने ही गाडी भारतीय सैन्याच्या सेवेतही दाखल झाली. लष्कराकडून 1991 साली मारुती कंपनीला जिप्सीची पहिली ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. तेव्हापासून लष्कराला कंपनीने 35 हजाराहून अधिक जिप्सी पुरवल्या आहेत. मागील वर्षी लष्कराकडून कंपनीला 4 हजार युनिट्सची सर्वाधिक ऑर्डर मिळाली होती. 500 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आणि शहरी, डोंगरी, वाळवंटाच्या भागात सहज प्रवास करण्याच्या क्षमतेमुळे ही गाडी लष्करात खास लोकप्रिय होती.
कशी होती जिप्सी?
मारुती सुझुकीच्या जिप्सीमध्ये 16 valve MPFI G13BB इंजिन असते. हे इंजिन 80 bhp पावर आणि 103 Nm टॉर्क जनरेट करु शकते. प्रतिलिटर 11.96 किमी इतका या गाडीचा मायलेज आहे. लष्करामध्ये आता टाटा सफारी स्टॉर्म आणि महिंद्राची स्कॉर्पिओ दिसतात.
नव्या नियमांनुसार गाडी बनवताना त्यामध्ये एअर बॅग्स बसवणं अनिवार्य आहे. मात्र जिप्सीमध्ये तसे होऊ शकत नसल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.