महिंद्रा कार ( फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा सध्या त्यांच्या Mahindra KUV100 NXT BS6 च्या खरेदीवर तडगी सूट देत दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आम्ही तुम्हाला फिचर्स आणि त्याच्या स्पेसिफिकेशनसह यावर देण्यात आलेल्या ऑफर्स बाबत ही माहिती देणार आहोत. भारतीय बाजारात लॉकडाऊनच्या दरम्यान लॉन्च झालेली Mahindra KUV 199 NXT BS6 च्या खरेदीवर सध्या 62,055 रुपयांची बचत केली जाऊ शकते. या कारची सुरुवाती एक्स शो रुम किंमत 5.54 लाख रुपये आहे.

पॉवर आणि स्पेशिफिकेन बद्दल अधिक माहिती द्यायचे झाल्यास, यामध्ये 1198cc चे पेट्रोल इंजिन दिले असून जे 5500 Rpm वर 82 hp ची पॉवर आणि 3500-3600 Rpm वर 15Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच गिअरबॉक्ससाठी इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स लेस आहे.(Mahindra च्या XUV500 वर ग्राहकांना मिळणार तब्बल 39 हजारांपर्यंत सूट, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स)

ब्रेकिंग स्टिटिमसाठी KUV100NXT च्या फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. तर सस्पेंशनसाठी KUV100 NXT च्या फ्रंटला मॅकफर्शन स्ट्रट सस्पेंशन आणि रियरमध्ये क्वाइल स्प्रिंग आणि हायड्रॉलिक गॅस चार्ज्ड शॉक एब्स्रोबरसह सेमी इंडीपेंडट ट्विस्ट बीम सस्पेंशन दिले आहे. तसेच डायमेंशन बाबत बोलायचे झाल्यास, KUV100 NXT ची लांबी 3700mm, रुंदी 1735 mm, उंची 1655mm, फ्रंट ट्रॅक 1490mm, रियर ट्रॅक 1490mm, व्हिलबेस 2385m, ग्राउंड क्लिअरेंस 170mm, सिटिंग कॅपासिटी 6 सीटर आणि 5 सीटर ऑप्शन, फ्यूल टॅंक हा 35 लीटर क्षमतेचा दिला आहे.