KTM ची नवी बाईक प्रति महिना 5500 रुपये देऊन घरी आणता येणार, ऑफरचा लाभ घेण्यासाठी अशी करा बुकिंग
KTM (Photo Credits-Twitter)

भारतात अॅडवेंचर बाईकच्या सेगमेंटसाठी तरुण वर्ग नेहमीच नव्या बाईकच्या शोधात असतात. याच पार्श्वभूमीवर केटीएम (KTM) यांनी त्यांची बहुप्रतिक्षित बाईक KTM 250 Adventure लॉन्च केली आहे. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन लेस असणाऱ्या या बाईकची किंमत 2,48,256 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून एका विधानात असे म्हटले आहे की, संपूर्ण भारतात केटीएम शोरुम मध्ये याची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.(Mahindra Thar कंपनीने बंद केल्या दोन एन्ट्री लेव्हल वेरियंट, जाणून घ्या याची सुरुवाती किंमत)

जर तुम्हाला केटीएमची ही नवी बाईक खरेदी करायची असल्यास त्यासाठी EMI 5500 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. म्हणजेच तुम्ही 5500 रुपये देऊन केटीएमची ही बाईक आपल्या घरी आणू शकता. नव्या केटीएम 250 अॅडवेंचर कंपनीची 390 एडीवी च्या 57 हजार रुपयांपेक्षा स्वस्त आणि ड्युक 250 च्या तुलनेत जवळजवळ 40 हजार रुपये महागडी आहे.

KTM 250 अॅडवेंचरमध्ये 248cc DOHC चार वॉल्व सिंगल सिलेंडर युक्त लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जे BS6 कंम्पलाइंट असून इलेक्ट्रॉनिक फ्युल इंजिनसह येणार आहे. हे इंजिन 30hp ची पॉवर आणि 24Nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे. तर 6 स्पीड गिअरबॉक्स लेस आहे.(TVS Apache RTR 200 4V: भारतीय मोटार कंपनीची धमाकेदार बाईक टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4 व्ही झाली लॉन्च; ही आहेत खासियत)

डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास केटीएम 250 अॅडवेंचर एन्ट्री लेव्हल टूरर मध्ये एलईडी डीआरएल्ससह हॅलोजन लॅम्प दिले जाणार आहेत. 19 इंचाचे फ्रंटला आणि 17 इंचाचे रियर व्हिलवर MRP Mogrip Meteor FM2 ट्युबलेस टायर्स दिले जाणार आहेत. यामध्ये उत्तम टुरिंग आणि ऑफ रोडिंग सुविधांसाठी 858 मिमीची सीटची उंची, 14.5 लीटर फ्युल टँक, नॉबी टायर्स, हाय सेट हँडलबार आणि शॉर्ट टेलसह अपस्पेट एग्जॉस्ट ही दिले गेले आहेत.