KTM ने आपली बहुचर्चित बाईक 125 Duke भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत मुंबईतील एका एक्स शोरुममधील माहितीनुसार १.१८ लाख इतकी आहे. KTM 125 Duke ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त किमतीची बाईक ठरली आहे. बाईकची स्टायलींग KTM 200 Dukeसारखीच आहे. KTM 125 Duke ABSयुक्त आहे.
केटीएम 125 ड्यूक मध्ये 124.7CC, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9,250rpm वर 14.5hpची पॉवर आणि 8,000rpm नप 12Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड ट्रान्समिशन युक्त बनविण्यात आले आहे. या बाईकला सिंगल चॅनल एबीएस देण्यात आले आहे. ब्रेकींगबाबत सांगायचे तर, नव्या बाईकच्या फ्रंटला 300mm डिस्क आणि रियरमध्ये 230mm डिस्क देण्यात आला आहे.
200 ड्यूक प्रमाणे दिसणाऱ्या बाईकला हटके बनविण्यासाठी दोन वेळा डिजाईन केलेले ग्राफीक्स देण्यात आले आहेत. यात स्ट्रीय नेक्ड बाईकमध्ये ट्रेली फ्रेम, अॅल्युमिनियम स्विंगआर्म, फ्रंटला 43mm अपसाईड डाऊन फोर्क्स आणि रयरमध्ये 10-स्टेप अडजेस्टेबल मोनोशॉक आहेत. केटीएम 125 ड्यूकची सीट हाईट 818mm आणि तिचे वजन 148 किलोग्राम इतके आहे. ही बाईक मायलेज किती देते याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, 124.7ccचे इंजिन असल्यामुळे अर्थातच चांगले मायलेज असेल असा अंदाज आहे. (हेही वाचा, जगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स)
125 ड्यूक लॉन्चींगदरम्यान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बाईक केटीएमच्या देशभरातील 450 शोरुम्समध्ये उपलब्ध असणार आहे. केटीएमची सर्वात स्वस्त म्हणून ओळखल्या या बाईकसाठी देशभरातून लॉन्चींगपूर्वीपासूनच बुकींग सुरु झाले आहे.